मुंबईच्या ६८ वर्षीय वीरेन कपाडिया यांना लिव्हरचा सिरोसिसचा आजार झाल्याने त्यांचे लिवर खराब झाले होते. चार वर्षे हा त्रास सहन केल्यावर अखेर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना लिव्हर मिळवून दिला. सर्जरी करून दोन महिने झाले पण आतापर्यंत कोणताही त्रास नाही.
एका ब्रेन डेड पेशंटमुळे मला जीवदान मिळाले. त्या पेशंटचा मी आभारी आहे.
- वीरेन कपाडिया
अवयवदान करून स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगण्याची संधी द्या,' असा संदेश कपाडियांनी दिला.