Monday, June 23, 2014

Stay in queueSaturday, August 3, 2013

जगण्याची संधी द्या

मुंबईच्या ६८ वर्षीय वीरेन कपाडिया यांना लिव्हरचा सिरोसिसचा आजार झाल्याने त्यांचे लिवर खराब झाले होते. चार वर्षे हा त्रास सहन केल्यावर अखेर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना लिव्हर मिळवून दिला. सर्जरी करून दोन महिने झाले पण आतापर्यंत कोणताही त्रास नाही. 
एका ब्रेन डेड पेशंटमुळे मला जीवदान मिळाले. त्या पेशंटचा मी आभारी आहे. 
                                                                                                -   वीरेन कपाडिया
अवयवदान करून स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगण्याची संधी द्या,' असा संदेश कपाडियांनी दिला.

Sunday, July 28, 2013

खेकडा आणि समुद्राची मैत्री

एकदा एक खेकडा समुद्र किनाऱ्यावर खेळत होता. त्याच्या तीरप्या चालीने वाळूवर काही रेखाटत होता. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकत होत्या आणि त्याने मागे सोडलेले त्याचे पदचिन्ह पुसत होत्या.
त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले, "आपण तर मित्र आहोत मग सांग बरे तु असे का केले ? मी मेहनतीने इतकी सुंदर नकाशी केली तु मात्र क्षणात येवून ती पुसली! " हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली तु मेहनतीने सुंदर नकाशी काढली. मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली कारण या किनार्यावर एक कोळी फिरत आहे काही सावज मिळते का हे शोधत आहे. जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने तुला सहज शोधले असते. खरचं माला तुला दुखवायचे नव्हते रे, मला तुला कायमचे गमवायचे हि नव्हते. हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली क्षणाचाही वेळ न दडवता त्याने लाटेची माफी मागीतली यालाचं कदाचित खरी मैत्री म्हणातात.
सारे जिवलग मित्र एकमेकांवर असेचं प्रेम करतात.

Saturday, April 27, 2013

परफेक्ट

"एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,"
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?

फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.

फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.

फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर...

मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?

मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.

२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.

३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, वआपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | GreenGeeks Review